Sanjay Raut On Kirit Somaiya: INS विक्रांत निधी घोटाळ्यावरुन राऊतांची सोमय्या यांच्यावर टीका
Continues below advertisement
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्यांवर पुन्हा निशाणा साधलाय. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यावरुन राऊतांनी पुन्हा एकदा सोमय्या यांच्यावर टीका केलीय. ५८ कोटींचा हिशोब द्यावाच लागेल आणि सोमय्या पिता-पुत्रांना जेलमध्ये जावंच लागणार असा इशारा राऊतांनी दिलाय. तसंच सोमय्या पिता-पुत्र फरार झाल्याचा दावाही राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून केलाय.
Continues below advertisement