Sanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावा

Sanjay Raut On Eknath Shinde: काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काँग्रेसमध्ये यावं, त्यांना आम्ही मुख्यमंत्री करु असं नाना पटोले म्हणाले होते. नाना पटोलेंच्या या ऑफरवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोलेंची ही ऑफर ऐकून माझी वाचा गेली, मी यावर काय बोलू शकतो, असं संजय राऊत म्हणाले. नाना पटोले आमचे सहकारी आहेत जेष्ठ नेते आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं. राजकारणात सर्व शक्यता असतात. नाना पटोले यांनी ऑफर दिली असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असं संजय राऊतांनी सांगितले. 

एकनाथ शिंदेंच्या भगव्या रंगाशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांचा भाजपशी संबंध आहे. एकनाथ शिंदेंचा भगवाशी काही संबंध नाही. भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. तो उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते; संजय राऊतांचा दावा

एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा...अहमद पटेल आता नाहीत. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola