Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : पिक्चर अभी बाकी है! मकाऊ कसिनो प्रकरणावरुन इशारा

Continues below advertisement

Sanjay Raut on Chandrashekhar Bawankule : पिक्चर अभी बाकी है! मकाऊ कसिनो प्रकरणावरुन इशारा

Thackeray Group MP Sanjay Raut Tweet: मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut Shiv Sena) पुन्हा एकदा भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना अप्रत्यक्षरित्या डिवचलं आहे. राऊतांनी मकाऊतील एक व्हिडीओ शेअर केला आहे. पिक्चर अभी बाकी है असं म्हणत राऊतांनी 6 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परदेशात कसिनो खेळत असल्याचा आरोप याआधीच संजय राऊतांनी केला होता. त्याबाबतचा कथित फोटो राऊतांनी शेअर केला होता. त्यावरुन उठलेली आरोपांची राळ खाली बसण्यापूर्वीच राऊतांनी आता व्हिडीओची झलक शेअर केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram