Amit Shah on Sanjay Raut : शिवरायांची माहिती शाहांकडून घ्यावी इतकी वाईट वेळ आली नाही

Continues below advertisement

Amit Shah on Sanjay Raut : शिवरायांची माहिती शाहांकडून घ्यावी इतकी वाईट वेळ आली नाही - राऊत

Sanjay Raut on Amit Shah : अमित शाह यांच्या भाषणात त्यांनी शिवाजी महाराज असा उल्लेख केलेला नाही. त्यांनी शिवाजी, शिवाजी, शिवाजी, असा एकेरी उल्लेख केला आहे. ऐरवी शिवाजी महाराज नाही म्हणाल तर याद राखा ते छत्रपती होते. ते छत्रपती किंवा महाराज आहेत, हे देशाच्या गृहमंत्र्यांना माहित नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे भाजपचे नव्हते. कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही निमंत्रण दिलं नाही. फक्त महाराजांचे जे वंशज भाजपची हाजी हाजी करताय, त्यांनाच तुम्ही निमंत्रण दिले. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राजकारण पाहून छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola