Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

Continues below advertisement

Sanjay Raut on Amit Shah: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार (Central Government) आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. संसदेचे कामकाज, शिवसेना पक्ष व चिन्ह सुनावणी आणि भाजपमधील अंतर्गत राजकीय घडामोडींवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. विशेषतः गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्याला नकार दिल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाह अन् मोदींमध्ये मतभेद; राऊतांचा मोठा दावा

खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या संसदेतील अनुपस्थितीवर बोट ठेवताना म्हटले की, "अमित शाह यांना संसदेत येण्यापासून कोणी रोखले आहे? मुळात अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मतभेद आहेत. अमित शाह यांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचे आहे. अमित शाह यांनी मागणी केली आहे की, मला तुमचे वारसदार म्हणून, देशाचे उपपंतप्रधान म्हणून घोषित करा आणि मोदींनी त्याला नकार दिला आहे," असा मोठा दावा त्यांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola