Sanjay Raut on Amit Shah : मतदार यादीतील घोटाळेबाज अमित शाह, राऊतांचा हल्लाबोल

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकाचा निकाल आहे. मात्र निकालाच्या पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणार आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, 20 तारखेला मतदान आहे. 23 तारखेला निकाल आहे आणि 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन करायचे आहे. खरं म्हणजे इतका कमी वेळ दिला जात नाही. महाविकास आघाडी निवडणूक जिंकणार आहे. 23 ला जर मतमोजणी आहे तर पूर्ण निकाल लागेपर्यंत 24 तारीख उजाडेल. 24 ते 26 नोव्हेंबर असा 48 तासांचा वेळ नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणार आहे. पण हा वेळ पुरेसा नाही. 

अमित शाहांकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं षडयंत्र

48 तासांत सरकार स्थापन करून शपथविधी करावा लागणार आहे. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागणार आहे. निकालानंतरच्या 48 तासांत सरकार बनले नाही तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाह यांचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram