Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

Continues below advertisement

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) दिल्लीच्या राजकारणात जाणार असल्याच्या आणि त्यांना तिथे मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सोमवारी (ता 17) देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिल्ली दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली होती, या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते मुंबईत आणि महाराष्ट्रातच राहणार असल्याचं सांगत दिल्लीच्या राजकारणात जाण्याबाबतच्या चर्चांवरती त्यांनी पूर्णविराम दिला, त्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक संपन्न राज्य असून या राज्याच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठी जबाबदारी असू शकत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व असून, त्यांची सर्वाधिक गरज महाराष्ट्रालाच आहे, दिल्लीला नाही, अशी भावना व्यक्त केली, त्याचबरोबर राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीला पाठविण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्या म्हणाल्या. तर याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, इकडच्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचं आहे, खूप मोठा बंगला मिळेल, त्याच्यामुळे हळूहळू वहिनी साहेबांनी मानसिकता तयार केली पाहिजे.(Sanjay Raut PC)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola