Maha Politics: राज ठाकरेंनंतर राऊतांची शरद पवारांसोबत खलबतं, १ नोव्हेंबरच्या मोर्चाआधी नवी समीकरणं?

Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेस (SCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, कालच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थवर भेट घेतली होती. 'निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल, तर त्यांना रस्त्यावर उतरून दणका द्यावाच लागेल', असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. या भेटीगाठी १ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या संयुक्त मोर्चाच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. मतदार याद्यांमधील घोळाच्या मुद्द्यावरून हा मोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गाठीभेटींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय समीकरणे जुळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola