Sanjay Raut vs Navneet Rana : 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत ठाम, मविआ-महायुतीत जुंपली

Continues below advertisement

अमरावती :  अमरावतीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची नवनीत राणांवर (Navneet Rana)  टीका करताना जीभ घसरली. त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. खासदार नवनीत राणा यांनी देखील संजय राऊतांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करण्याआधी राऊतांनी आपल्या आईकडे आणि मुलीकडे पाहायला हवं होतं, असे म्हणत  अमरावतीमध्ये आयोजित सभेत नवनीत राणांनी संजय राऊतांना उत्तर दिले आहे.

नवनीत राणा म्हणाल्या,  कोण आहे संजय राऊत? सीतेला पण भोग चुकले नाही.आपण तर राजकारणात आहे. संजय राऊतांनी बोलताना ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिच्याकडे पाहायला हवे होते. माझ्यावर टीका करण्याअगोदर आपल्य पत्नीकडे तरी एकदा पाहायचे होते. एखादी महिला जर बाहेर येऊन काम करते तर ती तिचा स्वाभिमान विकत नाही. अमरावतीची तर मी सून आहे. नवनीत राणांसोबत अमरवातीतील प्रत्येक महिलेचा स्वाभिमान, सन्मान जोडला गेला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram