Sanjay Raut Kolhapur Full Speech : 40 चोरांपैकी साडे तीन चोर कोल्हापुरात आहेत : संजय राऊत
Sanjay Raut : उद्धव ठाकरे आव्हान वाटत आहेत म्हणून यांनी शिवसेना फोडली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, पण कितीही खंजीर खुपसा, शिवसेना संपणार नाही. तुम्ही आता निवडणुका घ्या 150 जागा आम्ही जिंकू असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. तसंच गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या देता, बाळासाहेबांचा आत्मा गद्दारांच्या हातात देताना लाज कशी वाटली नाही? इतके बेईमान कसे झाला? असा घणाघात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. राऊत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये शिवगर्जना मेळाव्यात भाजप, शिंदे गटावर सडकून टीकास्त्र सोडले. हिंमत असेल तर अदानींना नोटीस पाठवा, अशा शब्दात राऊतांनी हक्कभंगावरुन हल्लाबोल केला. कोल्हापूर छत्रपती शाहूंची भूमी आहे, कडवट इमानदारांची भूमी आहे. कोल्हापुरातील संदेश राज्यात जातो. पुन्हा एकदा शिवसेनेचं नंदनवन होईल, पानगळ झाल्याशिवाय वसंत बहरत नाही, असेही ते म्हणाले.