Sanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : पाकव्याप्त काश्मीर, मणिपुरात तिरंगा फडकवून दाखवा - संजय राऊत 

पुण्यातल्या खडकवासलामधल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींची ऑडिओ क्लिप ऐकवत महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला. व्होट जिहादचा नारा दिला जात आहे, आता आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेल, असं फडणवीस म्हणाले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. 

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस बांगलादेश किंवा पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवत नाहीयेत. हा महाराष्ट्र आहे. मतदाराला भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकार आहे. ते आपलं मत त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला किंवा पक्षाला देऊ शकतात. भारतीय जनता पक्षाचा लोकांना संविधानाविषयी प्रेम नाही. त्यांना संविधान बदलायचे आहे. तुम्ही मतदारांवर पद्धतीने दबाव आणत आहात. गोंधळ निर्माण करत आहात. देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे धर्मयुद्ध आहे. हे धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्मयुद्ध आहे. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध सुरु आहे, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram