Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर? संजय राऊतांचं मोठ वक्तव्य

Continues below advertisement

Sanjay Raut PC FULL : मविआशी काडीमोड? पालिका स्वबळावर? संजय राऊतांचं मोठ वक्तव्य 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) बीएमसी निवडणुकीपूर्वी (BMC Election) महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय.     संजय राऊत म्हणाले की, अजिबात नाही, आत्ताच निकाल लागलेला आहे. निकालासंदर्भात सगळ्याच पक्षांचे चिंतन, मंथन, अभ्यास सुरू आहे. तिन्ही पक्षांना धक्का बसलेला आहे. याबाबत कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारणांची दिशा पाहिली तर ती ईव्हीएमच्या दिशेने जात आहे. ज्या पद्धतीने पैसे वापरले, त्या पद्धतीने जात आहे. त्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या संदर्भात चर्चा करावी लागेल.   राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात राहुल गांधी यांच्याशी काल आम्ही चर्चा केली. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते, निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांना वाटतं की, आपण स्वतंत्रपणे लढायला हवं होतं. पण, आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्या संदर्भातला एक निर्णय घ्यावा लागतो. राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात. आम्ही लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram