Sanjay Raut Full PC : आधी फक्त फुटलेले आमदार , खासदार हेच लाडके होते
Sanjay Raut Full PC : आधी फक्त फुटलेले आमदार , खासदार हेच लाडके होते - देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखालील भाजपचा आम्ही पराभव केला..काही जागा अगदी थोड्या फरकाने गेला त्यात अकोल्याचीही होती - विदर्भात आम्हाला अपेक्षित यश आलंय - आता विधानसभेची तयारी सुरू केली आहेय - लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, मात्र तो 1500 चा जो आकडा आहे त्यात आमचं सरकार आल्यावर भरगोस वाढ करू - लोकसभा हरल्यावर लाडक्या बहिणींची आठवण आली, तोवर फुटलेेले आमदार लाडके होते - निवडणुका त्याना वेळेत घ्याव्याच लागतील आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालेलंच दिसेल - आम्ही तीनही पक्ष एकत्र आहोत..आणि एकत्रच लढू - पैसा आणि सत्ता यांच्यासमोर महाराष्ट्र झुकणार नाही आम्ही लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं - महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी वातावरण अत्यंत अनुकुल आहे..म्हणून तपास यंत्रणांचा आमच्या विरोधात वापर केला जातो - यापुर्वी राज्याने दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले मात्र इतका लोचट मुख्यमंत्री आजवर पाहिला नाही - शिवाजी महाराजाचं नाव खराब होईल अशी वर्तणूक या मुख्यमंत्र्यांची आहे - ज्यादिवशी यांची सत्ता जाईल तेव्हा दिल्लीश्वर पायाशी उभं कऱणार नाही - मंत्रालयात हल्ली ज्या फायलींची देवणा-घेवाण होते, त्या जर देण्या-घेण्यासंदर्भातील असतील तर त्याकडे दिल्लीचं लक्ष असतं - डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रकारे काम करायचे त्याप्रकारचं काम रामदास आठवले करत आहेत - ( राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचं नाव न घेता) या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे हस्तकाचं काम करतात...कधी मोदी-शहांना पाठिंबा देतात..कधी शिंदेंच्या सोबत जातात - खरं तर त्यांनी पूर्ण देशात उमेदवार उभे करावेत ज्यामुळे त्यांना जास्त पैसे मिळतील - अजित पवार जोवर त्यांच्या प्रिय काकांच्या सल्ल्यावर चालत होते तोवर चांगलं चाललं होतं..जेव्हा त्यांनी काकांची साथ सोडली तेव्हा अधोगती सुरू झाली - लोकसभेतली परिस्थिती पाहिल्यावर त्यांनी एजन्सी नेमली - ही भाजपची पद्धत आहे..त्या एजन्सीच्या सल्ल्यानुसार बोलले असतील - त्यांना ही उपरती कशी झाली कोणास ठाऊक.. खरं तर सगळ्या महाराष्ट्राला दिसत होतं की ते जे करतायत बहिण वि वहिनी ते चुकीचं आहे..पण यांना कळलं नाही का - विधानसभा निवडणुकांच्या आधी ते सुप्रियाताईंकडे जातील, राखी बांधून घेतील, भाऊबीजेलाही जातील हे सगळं झालं तर आश्चर्य वाटणार नाही - आता प्रश्न आहे सुप्रियाताई त्यावर काय वागतात मुद्दा आहे