Sanjay Raut Full PC : त्या तीन लोकांनी जर खोकेगिरी कमी केली तर बरं होईल - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : त्या तीन लोकांनी जर खोकेगिरी कमी केली तर बरं होईल - संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांचा गोळीबारात मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या तीन पैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यप आणि हरियाणाच्या गुरमैल सिंह या दोघांना वांद्रे पूर्व येथील चिल्ड्रन पार्कमधून अटक केली. तिसरा आरोपी शिवकुमार गौतम अद्याप फरार आहे. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, गुजरात एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतल्या एका हत्येची जबाबदारी घेते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचे सूत्रसंचालन गुजरातमधून होत आहे असे आम्ही म्हणत आहोत. त्याला हे ज्वलंत उदाहरण आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा, मुंबईतील माणसांना त्रास द्यायचा, मुंबईतील माणसांच्या हत्या करायच्या हे सर्व गुजरातमधून होत आहे. याचं सगळं सूत्रसंचालन गुजरातमध्ये होत आहे. खरं म्हणजे अमित शहा यांचा राजीनामा मागावा असं हे प्रकरण आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर तुमच्या गुजरातच्या तुरुंगातला एक गँगस्टर आमच्या महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्याची हत्या करतो आणि तुम्ही काय करताय? आतापर्यंत त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी याबाबत काही सांगणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram