Sanjay Raut Full PC : मोदी सरकार आल्यापासून देशात जवळपास 28 मोठे रेल्वे अपघात झाले

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : मोदी सरकार आल्यापासून देशात जवळपास 28 मोठे रेल्वे अपघात झाले

शहरातील वांद्रे टर्मिनसवर धक्कादायक घटना घडली आहे. येथे रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी (Bandra Railway Station Stampede Video) झाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल एकूण 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये ही घटना किती गंभीर आहे, याची कल्पना केली जाऊ शकते.   नेमकी घटना कशी घडली?  मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीची ही घटना वांद्रे टर्मिनसवर घडली. सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशी गर्दी करतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाणारे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात. दिवाळी आणि छट पूजा हे सण उत्तरेतील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे सण कुटुंबासोबत साजरे करावेत म्हणून मुंबईत कामाला आलेले उत्तर भारतीय या सणानिमित्त आपापल्या गावी जातात. गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी असेच प्रवासी वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर गेले होते. मात्र ही रेल्वे उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram