Sanjay Raut Full PC : लालबागचा राजा गुजरातला नेऊ शकतात; राऊतांचा शहांना टोला
Sanjay Raut Full PC : लालबागचा राजा गुजरातला नेऊ शकतात; राऊतांचा शहांना टोला
हेही वाचा :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आजपासून मुंबई दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते लालबागच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. त्यांनी यावं, मात्र मला सारखी भीती वाटते आहे की, ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक उद्योग त्यांनी पळवले, राज्यातील अनेक संस्था गुजरातला पळवल्या, त्याचप्रमाणे लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) देखील गुजरातला पळवतील की काय, अशी शंका मला आहे. कारण हे लोक काहीही करू शकतात. एकीकडे लालबागचा गणपती प्रख्यात आहे. देश विदेशातून लोक तेथे येत असतात. त्यामुळे लालबागचा राजा हे गुजरातला देखील घेऊन जातील, असा घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून पुढील दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गृहमंत्री मुंबईला येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी अमित शहांवर निशाणा साधत टीका केली आहे. महाराष्ट्राची जनता गृहमंत्ऱ्याना महाराष्ट्राचा शत्रू मानते राज्यातील अनेक प्रकल्प, व्यापार, उद्योग आणि महत्त्वाची केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. आज ते देशाचे गृहमंत्री आहत, मात्र ते कमजोर गृहमंत्री आहेत. एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. तर देशात जम्मू-काश्मीर, मणिपूर असेल किंवा देशातील इतर भाग असतील इकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे अजिबात लक्ष नाही. राजकारण, पक्षफोडी, लूटमार याला त्यांचा पाठिंबा आहे. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी सारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अधिक कमजोर करणे हे एका गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुबळा करायचा त्यांच्या प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ते वारंवार महाराष्ट्रात येत असतात. म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना महाराष्ट्राचा शत्रू मानते.