Sanjay Raut Full PC : पवारांचा पक्ष फोडण्यासाठी गौतम अदानींच्या भावाचा संबंध, संजय राऊतांचा आरोप

Continues below advertisement

Sanjay Raut on Sharad Pawar & Gautam Adani: पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज (रविवार) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या हस्ते 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स' या केंद्राचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गौतम अदानी आणि पवार कुटुंबातील सर्व दिग्गज नेते पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसून आले आहेत. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर सतत टीका होत असतानाच शरद पवार (Sharad Pawar) आणि गौतम अदानी एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक दावा केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, मुंबईवर मोदींचा आणि भाजपचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे, त्याला आमचा तात्विक आणि नैतिक विरोध आहे. गौतम अदानी यांना मुंबईला ताब्यात घेण्याच्या विरोधात मुंबईची लढाई आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने मुंबई गिळण्याचा प्रयत्न होत आहे. ते उद्योगपती आहेत. पण गौतम अदानींसारखा हव्यास इतर उद्योगपतींनी मुंबईच्या बाबतीत दाखवल्याचे दिसून येत नाही. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती या मुंबईमध्ये आलेत. पण ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, हे मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola