Sanjay Raut vs Devendra Fadnavis : आमदार फोडले सांगणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा
Sanjay Raut vs Devendra Fadnavis : आमदार फोडले सांगणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्यावरुन संजय राऊतांनी भाजपला चांगलंच घेरलंय.. पुण्यातल्या भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली होती... विधान परिषद निवडणुकीत विरोधकांचे २० आमदार आमच्याकडे आल्याचा दावा फडणवीसांनी केला होता... त्यावरुन राऊत चांगलेच आक्रमक झाले.. देवेंद्र फडणवीसांना अटक करुन त्यांची चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केलीय... महाविकास आघाडीच्या नेत्यांना जशास तसं उत्तर द्या असं सांगताना फडणवीसांनी ठोकून काढण्याची भाषा केली होती.. त्यालाही राऊतांनी उत्तर दिलंय..
हेही वाचा :
शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची घणाघाती टीका भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली होती. पण, ज्या नेत्यांमुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे सगळे नेते आता भाजपसोबत आहेत, असा पलटवार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. एवढेच कशाला अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात ज्या व्यासपीठावरुन शरद पवार यांच्यावर आरोप केले तिकडेच अशोक चव्हाण हे शाहांच्या बाजूला बसलेले होते. अशोक चव्हाण यांच्यावरही अमित शाह यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ही गोष्ट अमित शाह यांच्या लक्षात नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ते सोमवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.