Sanjay Raut on Eknath Shinde : आपल्या पापाचा खापर भारतीय नौदलावर फोडण्याचा प्रयत्न- संजय राऊत
Sanjay Raut on Eknath Shinde : आपल्या पापाचा खापर भारतीय नौदलावर फोडण्याचा प्रयत्न- संजय राऊत
पाणशेतच्या प्रलयानंतर, लातूरच्या भुूकंपानंतर झालेला हा सगळ्यात मोठा आघात आहे त्यातून घराघरांत स्वाभाविक प्रतिक्रिया उमटतायत त्यातील वैभव नाईकांनी महाराष्ट्राची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया दिली परवा मविआचा सरकारला जोडे मारो आंदोलन असा विराट मोर्चा आम्ही काढतोय सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालतंय कारण सरकारचे आर्थिक संबंध गुंतले आहेत ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने आपण मतं मागतो त्या महाराजांनाही त्यांनी सोडले नाही त्यांना ना जनाची ना मनाची - म्हणे वाऱ्याने पुतळा पडला वाऱ्याने तुमचे कॅमेरे उडाले नाही, नारळ-पोफळीच्या बागा पडल्या नाही भारतीय सैन्यानी हिमालयावर पुतळा उभारला..त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह नसायलाच पाहिजे शिल्पकार आपटे जो कुणी होता त्याला कसलाही कामाचा अनुभव नाही आपटेंना सुपारी देणारा ठाण्याचा कोण आहे कला-संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की या पुतळ्याला परवानगीच नाही पुतळ्याशी संबंधित कुठलंही काम त्यांच्या सूचनेप्रमाणे झालं नाही यामधे बरेच गुन्हेगार आहेत आणि आपटेला पाठीशी घालणारे वेगळे गुन्हेगार आहेत कोट्यवधींचा व्यवहार आहे मात्र यात इडी, सीबीआय, लष्कराचं इंटेलिजन्स कुणीच यामधे आलं नाही माफी मागून असा विषय मिटतो का..मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजे मग काय आम्ही चाळीस गद्दारांना माफी द्यायची का सरकारच्या गळ्याशी आल्यानं, तोंड दाखवायला जागा नसल्यानं असं बोलतायत मुख्यमंत्र्यांची माफी महाराष्ट्रानं स्वीकारायला पाहिजे..नुसती माफीला काही अर्थ नाही या शिल्पकाराला काम देण्याची शिफारस कुणाची होती हे तुम्ही जाहिर करा नंतर माफी मागा नवीन पुतळ्याचं काम कोणत्या ठेकेराला द्यायचं, बजेट वाढवून घ्यायचं यासंदर्भात आता बैठका घेतायत इथे ज्या प्रकारचं वातावरण आहे ते म्हणजे गृृहमंत्र्यांवरच प्रश्न आहे..राज्याचा गृहमंत्री दुबळा आहे तुमच्या राज्याच्या वर्दीच्या लोकांवर कोकणातले गुंड धावून जातात, तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकत नाही..तुम्ही कसे गृहमंत्री देवेंद्र फडणविसांना स्वतःला गृहमंत्री म्हणवून घेण्याचा अधिकार नाही सरकारची लाज गेली आहे ती चारही बाजूंनी सील करून परत येणार नाही प्रधानमंत्री कायम मौनात असतात..जिथे चमकायला मिळतं तिथे बरोबर येतात..ते येणार असतात तेव्हा चार-चार हेलिपॅड बांधतात एरवी शिवजयंतीला ते ट्विट टाकत असतात..माझी प्रेरणा वगैरे.. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्यांची पाठ वळली आणि पुतळा कोसळला..जो गुन्हेगार आहे त्याच्यावर बोला ना त्यांना एवढ्याशा गोष्टीवर लक्ष द्यायला वेळ नसेल...त्यांना युक्रेनचं युद्ध थांबवायचं असतं, पुतिनसोबत चहा प्यायचा असतो, पोलंडला जायचं असतं..ते काही सामान्य व्यक्ती नाही. आरोपींवर ज्याप्रकारचे गुन्हे दाखल केले तेव्हा त्यांना तातडीने जामिन मिळावे यासाठी ठाण्यातून सूत्र हलली