Sanjay Raut on CM Eknath Shinde: कोडगी लोक राजीनामा देत नाहीत, हिटलरनेही राजीनामा दिला नव्हता
Continues below advertisement
Sanjay Raut : लोकशाहीच्या मंदिरात तुम्ही लोकशाहीचे हत्याकांड करता. सरकारला राम मंदिरचे (Ram Mandir) उद्घाटन करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला. आम्हाला ते निमंत्रण देणार नाहीत. कारण आम्ही आमचं त्यात योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातील आरोपी आहोत. ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा असल्याचे मत राऊतांनी व्यक्त केलं. यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत, कारण ते कोडगे आहेत. कोडगे लोक कधी राजीनामा देत नाहीत. हिटलरने राजीनामा दिला नव्हता, आत्महत्या केली होती, असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
Continues below advertisement