त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, Sanjay Raut यांचा भाजपावर हल्लाबोल
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.. संजय राऊत यांनी भाजपवर टीकेचा बाण सोडला.. त्यांचे घोडे त्यांचा बाजार, आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही, असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपावर केला.
Tags :
Maharashtra News Sanjay Raut Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Rajya Sabha Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Sanjay Pawar