Maharashtra Politics : 'नरकासुराचा जन्म Guwahati ला झाला', Sanjay Raut यांची Shinde गटावर जहरी टीका
Continues below advertisement
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील संघर्ष जागावाटपावरून पुन्हा एकदा पेटला असून, यात आता भाजपचे (BJP) माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनीही उडी घेतली आहे. 'नरकासुराचा जन्म Guwahati ला झाला, आणि ते नरकासूर आज इथे आहेत', अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर थेट हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी शिंदे गटावर दिवाळीच्या मुहूर्तावर टीकास्त्र सोडले. या टीकेला उत्तर देताना भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी, राऊत यांच्या डोक्यात 'चीनी व्हायरस' शिरल्याची टीका केली आहे. इतकेच नाही, तर संजय राऊत हे शिवसेना उबाठाचे प्रवक्ते आहेत की काँग्रेसचे? असा सवालही बन यांनी विचारला असून, या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement