Maharashtra Politics : ‘पाच कोटी रुपये ही लाच आहे’, निधी वाटपावरून Sanjay Raut यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर थेट हल्ला
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आमदार निधी वाटपात (MLA Fund Allocation) भेदभाव केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 'पाच कोटी रुपये ही लाच आहे, मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही, आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे,' असे खळबळजनक वक्तव्य राऊत यांनी केले. त्यांनी म्हटले की, केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी दिला जात आहे आणि विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. हे कृत्य पूर्णपणे घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि लोकशाहीविरोधी कटकारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला. निधी हवा असेल तर पक्षात या, असा दबाव आणून लोकशाही संपवण्याचा हा प्रकार सुरू आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात राज्यपालांचे अस्तित्व केवळ भाजपचे हस्तक म्हणून असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जनतेच्या पैशाचा वापर अशाप्रकारे केवळ आपल्या लोकांमध्ये करणे हा अहंकार आणि मस्तवालपणा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement