Marathi unity | मुंबईवर मराठी झेंडा फडकवण्यासाठी विखुरलेल्या मराठी शक्तींना एकत्र येण्याचे आवाहन
मराठी माणसांत फूट पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुंबईवर मराठी झेंडा फडकवण्यासाठी सर्व मराठी शक्तींनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. राज ठाकरे यांनीही अशीच भूमिका जाहीर केली असल्याचे राऊत यांनी सांगितले. उद्याच्या मोर्च्यामुळे महाराष्ट्रात चांगले वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.