Rashmi Shukla राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, Sanjay Raut, Eknath Khadse यांची टीका
Rashmi Shukla राज्याच्या पोलीस महासंचालकपदी, Sanjay Raut, Eknath Khadse यांची टीका
IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालीये. या निमित्तानं राजाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून शुक्ला यांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलंय. गेल्या काही दिवसांपासून शुक्ला यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू होती. त्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. जून २०२४मध्ये त्या निवृत्त होत आहेत, मात्र त्यांच्या सेवेत दोन वर्षांची वाढ देखील करण्यात येऊ शकते. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना शुक्ला वादात सापडल्या होत्या. २०१९ची विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. तेव्हा त्यांनी विरोधी नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप मविआ नेत्यांनी केला होता. त्याबाबत मुंबई आणि पुण्यात FIR देखील दाखल झाल्या होत्या. नंतर महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर या FIR मागे घेण्यात आल्या.