Sanjay Rathod : संजय राठोडांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्री म्हणतात...
Continues below advertisement
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर राज्यातील मेडिकल स्टोअर चालक संघटनेनं गंभीर आरोप केले आहेत... ज्या मेडिकल स्टोअर चालकांकडून नियमांचं उल्लंघन होतं, त्यांच्याकडून प्रचंड पैशाची मागणी केली जाते, असा थेट आरोप महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशननं केलाय.... तसं पत्रच त्यांनी मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलंय. ड्रगिस्ट असोसिएशननं राठोड यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचं नाव घेऊन आरोप केले आहेत... राठोड यांचे खासगी सचिव डॉ. विशाल राठोड, ओएसडी संपत डावखर आणि चेतन करोडीदेव हे तिघे पैसे मागतात, असा थेट आरोप करण्यात आलाय... एवढंच नाही तर तक्रारीची दखल न घेतल्यास आम्ही आंदोलन करू, आणि वेळ पडल्यास संपावर जाऊ असा अशाराही संघटनेनं दिला आहे...
Continues below advertisement