Sanjay Nirupam on Thackeray : खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी लाचारी केली? निरुपमांचा सवाल
Continues below advertisement
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार निशाणा साधला आहे. 'खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांची लाचारी स्वीकारली आणि विचार त्यागले', अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. त्यांनी महाविकास आघाडीला सवाल केला की, मनसेला (MNS) मागच्या दाराने आघाडीत प्रवेश दिला आहे का, यावर काँग्रेसने (Congress) स्पष्टीकरण द्यावे. निवडणुका झाल्यास दारुण पराभव होईल या भीतीनेच महाविकास आघाडीचे नेते निवडणुका टाळण्याची मागणी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बिहार निवडणुका होईपर्यंत महाविकास आघाडीत समावेश होणार नाही, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement