Sanjay Gaikwad controversial statement | छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, विधानानंतर सारवासारव

मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना एका आमदाराची जीभ घसरली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना आणि ठाकरेंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दल अपशब्द वापरले. या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी सारवासारव देखील केली आहे. "तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या मग ते मूर्ख होते?" असे त्यांनी विचारले. छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते, तसेच ताराराणी, येसूबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी हिंदी भाषेसह अनेक भाषा शिकल्या असेही त्यांनी नमूद केले. या विषयावरून वाद करून मतांचे राजकारण करणे चुकीचे आहे असे त्यांचे मत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना सोळा भाषा अवगत होत्या आणि राज्य करताना सगळ्या भाषांचा अभ्यास असला पाहिजे हे त्यांनी तीनशे चारशे वर्षांपूर्वी विचार करून स्वतःमध्ये आत्मसात केले होते. आपल्या भाषेचा आपल्या राज्यात कोणी तिरस्कार करेल तर त्याला सोडणार नाही, पण इतरांच्या भाषेचा तिरस्कार करणे योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. सगळ्या भाषा येणे हे महत्त्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola