Sanjay Bansode : संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या घरी पोलीस, तपास सुरु
Sanjay Bansode : संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या घरी पोलीस, तपास सुरु
लोकसभेतील घुसखोरीची घटना घडल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तातडीनं पोलीस महासंचालकांना फोन केला आहे. या घटनेतील आरोपी महाराष्ट्रातील असल्यानं त्यांची लवकरात लवकर माहिती घ्या असे निर्देश फडणवीसांनी दिले. तसेच लोकसभेतील घटनेनंतर विधिमंडळ सचिवांनी सुरक्षेचा आढावा घेतला असून विधिमंडळ परिसरातील सुरक्षा कडक करण्याचे सचिवांनी आदेश दिले आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून त्यावेळी सुरक्षेसंबंधित दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेमध्ये दोन युवकांनी संसदेच्या परिसरात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या घटनेमध्ये दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून संदसेद उतरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घटनेतील तरुणांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यापैकी एका घटनेतील तरूण अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे.