Osmanabad Agitation | आंतरराष्ट्रीय शाळेच्या मान्यतेसाठी उस्मानाबादमध्ये गावकऱ्यांचं आंदोलन

Continues below advertisement
 ठाकरे सरकारच्या आणखी एका निर्णयाविरोधात उस्मानाबादेत आंदोलनं करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांशी निगडीत शाळा सुरु करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय ठाकरे सरकारने रद्द केला आहे. हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याचा आरोप करत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये सरकारविरोधात आंदोलन करण्यात येतं आहे. कळंब तालुक्यातल्या शिराढोण या गावातल्या आंतरराष्ट्रीय शाळेला पुन्हा मान्यता द्यावी यासाठी एक दिवसाचा बंद पाळण्यात आला... तर सांजा गावातल्या आंतरराष्ट्रीय शाळेला पुन्हा मान्यता द्यावी यासाठी शाळा बेमुदत बंदचे आंदोलन सुरू झाले आहे. आज त्याचा दुसरा दिवस आहे. जर राज्य सरकारनं ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्या कळंब नाका- लातूर मार्गावर रस्ता रोको केला जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram