Sanitizer Bottle Blast | कोल्हापुरात सॅनिटायझर बॉटलचा स्फोट; एका महिलेचा मृत्यू
कोल्हापूर : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली. सुनीता काशिद असं या मृत महिलेचं नाव आहे. घरातील कचऱ्यातून बाटली दारात आणली आणि दारातील कचरा पेटवल्यानंतर सॅनिटायझर बाटलीचा झाला स्फोट झाला. या स्फोटोत महिला 80 टक्के भाजली. त्यानंतर उचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला.