Rohini Hattangadi | रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान | ABP Majha
मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार सोहळा सांगली मध्ये मोठ्या थाटात पार पडला आहे. यंदाचा 54 वा पुरस्कार हा जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आला. विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात 99 व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते