Sangli Congress Special Report : काँग्रेसचं स्नेहभोजन, विशाल पाटलांची हजेरी, मविआत कुरबुरी

Continues below advertisement

Sangli Congress Special Report : काँग्रेसचं स्नेहभोजन, विशाल पाटलांची हजेरी, मविआत कुरबुरी

लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून झालेले रुसवे फुगवे महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेत. सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत तर आरोप आणि टीकांच्या जोरदार ठिणग्या उडाल्या... ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी परस्पर जाहीर केली आणि त्यावरून वादाचा नवा अध्याय सुरू झाला. अशातच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली... आता निवडणूक संपल्यावरही या जुन्या वादाला पुन्हा उकळी फुटलीय... आणि त्याचं कारण ठरलंय, काँग्रेसने आयोजित केलेला स्नेहमेळावा... पाहूयात नेमकं काय झालंय. सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. कॉंग्रेस मधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्याने आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्याने या स्नेहमेळावाचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. तसेच या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola