Sangli : ...अन्यथा येणाऱ्या काळात राज्यात उद्रेक होईल ; सांगलीतील व्यापाऱ्यांचा सरकारला इशारा
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केलीय. 4 तास, दुकानाना परवानगी देऊन या तासात जास्त गर्दी होतेय, त्यामुळे कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव होतोय ,त्यामुळे दुकाने उघडण्यास घातलेली वेळ बंद करावी असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलेय. सांगली जिल्ह्याचा समावेश पुन्हा चौथ्या स्तरात झालाय. यामुळे सांगलीतील व्यापाऱ्याना अजून देखील दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे या निर्णयावर सांगलीतील व्यापाऱ्यांना काय वाटतेय हे जाणून घेतलय प्रतिनिधी कुलदीप माने यांनी