Sangli : शाळेच्या मदतीसाठी धावला माजी विद्यार्थी; शाळेसाठी बांधली सुसज्ज इमारत ABP Majha
हलाखीच्या परिस्थितीत ज्या संस्थेत शिक्षण झाले त्याच संस्थेच्या एका शाळेला 61 लाखाची देणगी देत संस्थेसाठी सुसज्ज इमारत उभारण्याचे काम तासगाव तालुक्यातील एका उद्योजकाने केलेय. उद्योगपती बाबुराव विष्णू जवळेकर असे त्याचे नाव आहे. जवळेकर यांनी तासगाव तालुक्यातील सावर्डे मधील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भवानीदेवी इंग्लिश स्कुलच्या प्रागणात 61 लाख रुपये खर्च करून भव्य अशी इमारत उभारलीय. बाबुराव जवळेकर यांच्या देणगीतुन साकारलेल्या या विस्तारित इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. श्री भवानीदेवी इंग्लिश स्कुलच्या प्रागणात उभारलेल्या या इमारतीत अत्याधुनिक प्रयोगशाळा, कॉम्प्युटर , फर्निचर उभारण्यात आले आहे. याशिवाय या इमारतीत गावातील नागरिकांसाठी लायब्ररी देखील उभारण्यात आली आहे. या इमारतीचा आणि इमारती मध्ये उभारलेल्या प्रयोगशाळा, लायब्ररीचा गावातील आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे.