Sangli River Man Rescue : पुरात पोहायला जाण्याची मस्ती अंगलट; हुल्लडबाजांना वाचवण्यात यश

Continues below advertisement

Sangli River Man Rescue : पुरात पोहायला जाण्याची मस्ती अंगलट; हुल्लडबाजांना वाचवण्यात यश

ही बातमी पण वाचा

संभाजीनगर, सांगली , नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Maharashtra Weather News : सांगली (Sangli) आणि अहमदनगरसह (Ahmednagar) राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे सांगली, नगरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. भाजीपाला,  आंबा आणि इतर फळांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर शहराला पावसाने झोडपून काढल्यानंतर आज राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीये. 

सांगलीत अवकाळी पावसाची हजेरी, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

सांगलीतील वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडासह आणि वाऱ्या वादळासह वीस मिनिटे सांगलीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय, गारांचाही पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे  परिसरातील आंबा , भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

अहमदनगरलाही अवकाळी पावसाने झोडपले

संभाजीनगर आणि सांगलीनंतर अहमदनगर शहर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. अहमदनगर शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र, अवकाळी पावसामुळे फळबागांसह इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या सभांनाही फटका बसणार आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram