Sangli Rains | कृष्णा नदीची पाणीपातळी 35 फुटांवर स्थिरावली, कृष्णेच्या तीरावरुन एबीपी माझाचा रिपोर्ट
सांगली जिल्ह्यातील पावसाचा ओसरलेला जोर आणि कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग यामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळी 35 फुटावर स्थिरावली आहे. काल रात्री कृष्णा नदीचे पाणी पातळी 36 फुटाच्या वर गेली होती यामुळे आज सकाळपर्यंत कृष्णा नदी 40 फुटाची इशारा पातळी ओलांडून अशी शक्यता व्यक्त केली जात होती . मात्र पावसाचा जोर ओसरला आणि कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने आता कृष्णा नदीचे पाणी पातळी 36 फुटावरून हळूहळू कमी होऊ लागली आहे. यामुळे कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी अजूनही ढगाळ वातावरण कायम असून पावसाची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.