ABP News

Sangli Lok Sabha Elections : कोण चीतपट होणार? सांगलीत कुणाचं पारडं जड? संपादकांचा अंदाज काय?

Continues below advertisement

Sangli Lok Sabha Elections : कुणाची पाठ लागणार? सांगलीत कुणाचं पारडं जड? संपादकांचा अंदाज काय?

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीच्या (Sangli Lok Sabha Election) मतदानानंतर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil)  आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांची एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरुच आहे. दुसरीकडे दोघांनीही आपल्याच विजयाचा दावा केलाय. मात्र हा दावा करत असताना दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला, असं संजयकाका पाटील म्हणाले होते. त्यावर आम्ही विरोधकांकडून अपेक्षा ठेवत नाही कारण माझा दोस्त दिलदारच आहे, असं उत्तर विशाल पाटील यांनी दिलं.  त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपाच्या सत्रामुळे सांगलीचे वातावरण अजूनही तापलेलं दिसून येत आहे. दरम्यान ही टीका टिपण्णी सुरू असताना या मतदारसंघात विजय कुणाचा होणार याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जातायत. याच पार्श्वभूमीवर विजय नेमका कुणाचा होऊ शकतो याबद्दल संपदकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram