Sangli : सांगलीत दुचाकीवरुन पर्स चोरण्याचा प्रयत्न, तिघांना नागरिकांकडून चोप ABP Majha

Continues below advertisement

सांगली शहरातील अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या कोल्हापूर रस्त्यावर दुचाकी घेऊन निघालेल्या महिलेच्या पर्सला हिसडा मारणाऱ्या तिघा दुचाकीस्वारांना नागरीकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयितांनी महिलेला रस्त्यावरून अक्षरशः फरपटत नेले. भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हजारोंच्या जमावाने गर्दी करत तिघांना ताब्यात दिले. त्यातील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सुरज सत्ताप्पा भोसले, वैभव कृष्णांत पाटील आणि मुनीब मुस्ताक भाटकर अशी त्या तिघांची नावे आहेत. या घटनेत महिला जखमी झाली. दरम्यान, या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram