Krishna River | सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली, शेतकऱ्यांसमोर पाणीसंकटाची भीती
ऑगस्ट महिन्यामध्ये अख्या सांगली शहराला विळखा घातलेली कृष्णा नदी आता जानेवारीतच कोरडीठाक पडली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अद्याप उन्हाळाही सुरु झालेला नाही, तोपर्यंत पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे.