Sangli Special Report : सांगलीत कृष्णा नदीचं पाणी पात्राबाहेर;निसर्गाचं रौद्ररूप, माणसाची घोडचूक
Sangli Special Report : सांगलीत कृष्णा नदीचं पाणी पात्राबाहेर;निसर्गाचं रौद्ररूप, माणसाची घोडचूक सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होतीये. रात्रीपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 10 फुटांनी वाढ झाली आहे. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून सांगलीत रात्रीपर्यंत कृष्णा नदीचे पाणी पातळी 30 फुटावर पोहोचण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 26 फुटाच्या वर गेली असून ती 30 फुटावर पोहोचल्यास सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होते. त्यामुळे या भागातील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात येत आहेत. सांगलीत कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होतीये. कृष्णा नदीच्या पाणीपातळी देखील सातत्याने वाढ होत असल्याने सांगलीत एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आलेय. कृष्णा नदीची पाणीपातळी 27 फुटावर असून ती 30 फुटावर गेल्यानंतर सांगलीतील सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होते. रात्री उशिरा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास रातोरात नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी आता प्रशासन सतर्क झाले असून एनडीआरएफचे पथकाकडून देखील कृष्णा नदी काठची आणि पुरपट्ट्याची पाहणी करण्यात आली.