Sangli Krishna River Crocodile : महापुरानंतर मगरी कृष्णा नदीपात्रात परतू लागल्या ABP Majha
सांगलीत महापुरामध्ये स्थलांतरित झालेल्या मगरी नदी पात्रात परतू लागल्या आहेत. नदी पात्राकडे परतणाऱ्या मगरी कृष्णा काठावर दिसू लागल्या आहेत. नदीकाठावर मगरींचा वावर वाढल्यानं वनविभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पलूस तालुक्यातल्या आमणापूरमध्ये नदीच्या काठावर वावरणारी १० फूट लांबीची मगर नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरलीय. या मगरीला पाहण्यासाठी लोक गर्दी करतायत. २००५ च्या पुरानंतरही मगरींनी अधिवासाचं ठिकाण बदललं होतं.