Sangli : बिलासाठी मृताला जिवंत केलं ; इस्लामपूरातील आधार हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार, डॉक्टरला अटक

Continues below advertisement

सांगली : मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत दोन दिवस उपचार सुरु ठेवले आणि बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारले. इस्लामपूरातील आधार हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आधार हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर यांच्यावर विश्वासघात, फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. वाठारकरला इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. 24 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात ही घटना घडली आहे. इस्लामपूर पोलिसांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मार्फत मागवलेल्या अहवालात वाठारकर दोषी आढळून आल्याने मृत महिलेचा मुलगा सलीम शेख याच्या फिर्यादीनंतर कारवाई करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram