Sangli : माडग्याळ शेळीबाजारातील व्यवहार चर्चेत, 6 मेंढ्यांची 14 लाखांना विक्री

Continues below advertisement

सांगलीच्या जत तालुक्यातील माडग्याळ शेळीबाजारातील एका व्यवहाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या बाजारामध्ये 6 मेंढ्यांची 14 लाखांना विक्री करण्यात आलीये. यातील प्रत्येक मेंढीला सव्वा दोन लाखांहून अधिकचा दर मिळालाय. कारच्या दरामध्ये या मेंढ्यांची विक्री झाल्यानं हा व्यावहार सध्या चर्चेचा विषय ठरतोय. जत तालुक्यातील माडग्याळचे शेतकरी मय्याप्पा चौगुले यांच्या मालकीच्या या मेंढ्या होत्या. मेंढ्यांना विक्रमी दर मिळाल्याने आनंदित झालेल्या शेतकऱ्याने मेंढीची हलगीच्या तालावर भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा केलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram