Sangli Flood : सांगलीत पूर पट्ट्यातील लोकांना अग्निशमन दलाकडून प्रशिक्षण ABP Majha
गेले दोन पावसाळे सांगली, कोल्हापूरला पुराचा चांगलाच फटका बसलेला आहे... त्यामुळे यंदा प्रशासनानं आधीपासून उपाययोजना सुरू केल्या ाहेत... कृष्णा नदी काठच्या पूर पट्ट्यात अग्निशमन दल सध्या नागरिकांना प्रशिक्षण देतेयं. आपत्ती काळात आपला आणि दुसऱ्याचाही बचाव कसा करावा याचे प्रशिक्षणही नागिरकांना दिलं जातंय.. आज सांगलीत गणपती मंदिरासमोर अग्निशमन विभागाने पूर पट्ट्यातील नागरिकांसाठी प्रबोधन मोहीम घेतली. यावेळी आपत्ती काळात घ्यावयाच्या दक्षतांबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. पुढील आठ दिवस पूर भागात आशा पद्धतीने प्रात्यक्षिके सादर केली जातील असे अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.