Sangli Fridge Blast: फ्रिजच्या स्फोटात जळून खाक, दुकानाला भीषण आग, चौघांचा होरपळून मृत्यू
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, तर दुसरीकडे एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश करत J&K आणि हरियाणा पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. 'प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली असावी', अशी माहिती समोर येत आहे. विट्याच्या सावरकर नगर येथील एका इमारतीत तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि स्टीलच्या दुकानात ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या जोशी कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये विष्णू जोशी (वय ४७), त्यांच्या पत्नी सुनंदा जोशी (वय ४२), मुलगी प्रियांका इंगळे (वय २५) आणि २ वर्षांची नात सृष्टी यांचा समावेश आहे. याचबरोबर, दिल्ली-एनसीआरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात आला असून, फरिदाबादमधून ३६० किलो स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. आदिल अहमद राथेर आणि डॉ. मुझम्मिल यांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement