Sangali Farmers Protest: सांगलीत शेतकऱ्यांचा एल्गार, सरसकट कर्जमाफीसाठी चक्का जाम

Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये (Tasgaon) शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 'तासगाव कवठेमंकाळसह सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करा,' अशी स्पष्ट मागणी आंदोलकांनी केली आहे. तासगाव शहरातील एस टी स्टँड चौकात झालेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर आणि जनावरे सोबत आणून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola