Sangli Crime | धक्कादायक! 35 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन हत्या; आरोपी फरार
सांगली : धक्कादायक बातमी... 35 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मारेकऱ्यानं महिलेचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही हत्या गावातल्याच 22 वर्षीय तरुणानं केल्याचं समजतंय. या गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर अटक करुन तिला फाशीचा शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी स्थानिकांनी कँडल मार्च काढला होता.