Sangli : आंतरजातीय विवाह करणाऱ्या 150 दाम्पत्यांना केलं बहिष्कृत, सहा जात पंचांविरुद्ध गुन्हा दाखल

आंतरजातीय विवाह करणाऱ्या 150 दाम्पत्यांना बहिष्कृत केल्याप्रकरणी, सहा जात पंचांविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रातील नंदिवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे 150 जोडप्यांना नंदिवाले जात पंचांनी समाजातून बहिष्कृत केलंय. त्यांना समाजातील कोणत्याही सुखदु:खाच्या कार्यक्रमात बोलावले जात नाही किंवा कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. अशा आंतरजातीय विवाह केलेल्या तीस जोडप्यांनी एकत्रपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार अर्ज दिला होता. अखेर अंनिसनं पाठपुरावा केल्यानंतर  पोलिसांनी 6 जात पंचांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola