Tractor Rally Against Farm Laws | कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसची आज सांगलीत ट्रॅक्टर रॅली
कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष सुरू केलाय. केंद्र सरकारने नव्यानं आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीच्या एसटी स्टँड परिसरातून ही रॅली सुरू झाली. नेमीनाथ नगर येथे रॅलीचा समारोप करण्यात येत आहे. जवळपास 800 ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत. कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, मोहनराव कदम जिल्ह्याधक्ष पृथ्वीराज पाटील,विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.